Home टपोरी टुरकी ....Jocks for You वाचा गुदगुल्या करणारे भन्नाट जोक्स…..Tapori Turaki मध्ये ज्योतिषी : तुझे नाव नम्रता...

वाचा गुदगुल्या करणारे भन्नाट जोक्स…..Tapori Turaki मध्ये ज्योतिषी : तुझे नाव नम्रता आहे? नम्रता : होय, महाराज… ज्योतिषी : पतीचे नाव संजय आहे? नम्रता : होय…होय…महाराज…

83
marathi jockes for every body...

एक मुंगी घाईत जात असलेली दुसºया मुंगीनं तिला विचारलं, अगं कुठं निघालीस इतक्या गडबडीनं?
पहिली मुंगी : अगं, दवाखान्यात जातेयं़़़
दुसरी : का… काय झालं?
पहिली : अगं हत्तीदादा आजारी आहेत ना! त्यांना रक्ताची गरज आहे़ मी रक्त देते जाऊऩ थोडं लक्ष असू दे माझ्या लुंगी बेबीकडं़़़

***

भरत्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता़
…ते, नव्हे, मी काय म्हणतोय ? त्या बुलेट ट्रेनमध्ये विनातिकिट सापडलं तर कसं!
मित्र : तर काय?
भरत्या बेंबीला गाठ मारून बोलला, तर आपल्याला भारतातल्या जेलमध्ये ठेवणार का जपानला हाकलणार?
काही दिवसांपासून भरत्या पासपोर्टच्या कार्यालयाभोवती फेºया मारतोया…

 

***

मला एक कळत नाही की, श्रीमंत मित्रांच्या बरोबर मैत्री केली तर आपण श्रीमंत होत नाही !
सेम तसंच…
हुशार मित्रांच्या बरोबर मैत्री केली की आपण हुशार होत नाही! पण…
दारूड्या मित्राबरोबर मैत्री केली की आपण पण दारूडे कसे काय होतो?

***
ज्योतिषी : तुझे नाव नम्रता आहे?
नम्रता : होय, महाराज…
ज्योतिषी : पतीचे नाव संजय आहे?
नम्रता : होय…होय…महाराज…
ज्योतिषी : संजयचे वय 45 वर्षे आहे ना?
नम्रता : होय…होय…महाराज…
ज्योतिषी : तुला एक मुलगा आणि एक मुलगी?
नम्रता : होय, एकदम बरोबर महाराज.
ज्योतिषी : मोठा मुलगा 18 वर्षांचा आणि त्यांचं नाव अंकित आहे?
नम्रता (नतमस्तक होत): होय महाराज.
ज्योतिषी : मुलगी 15 वर्षांची आणि नाव अनिषा आहे!
नम्रता (आवंढा गिळत): होय, महाराज बिलकुल तंतोतंत…
ज्योतिषी : दोन दिवसांपूर्वी तू 25 किलो गहू खरेदी करून आणले?
नम्रता (गुडघ्यावर बसते) : महाराज तुम्ही तर पूर्ण अंतर्यामी आहात…
ज्योतिषी (शांतपणे): परत येशील तेव्हा कुंडली घेऊन ये. रेशन कार्ड नको नाही…ये आता.

***

नवरा : कावं तुले कितला सावा सांगू… स्वयंपाक करताना मोबाईल मा तोंड खुपसत नको जाऊ मणीसन…वरणमा मीठ नही… हायद नही… मिरची नही…मसाला नही… नुसती पाणी सारखी फिक्कट शे.
बायको (लाटण फेकीसन): तुम्हलेबी कीतला सावा सांगेल शे मोबाईल मा तोंड खुपसीसन जेवत जाऊ नका…
आव, तं तुम्ही पाणीनाच ग्लासमा पोळी बुचकळीसन खाई राह्यनात ना…

***

रक्ताचं आणि बिनरक्ताच्या नात्यातील फरक काय ?
.
मुलगी दिवसभर झोपून आहे……… दु:ख होते.
.
.
.
सून दिवसभर झोपून आहे……नाटक करते.

 

*****