Home उपराजधानी नागपूर नागपुरात २०० बेड्सचे आदर्श बाल रुग्णालय तयार करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

नागपुरात २०० बेड्सचे आदर्श बाल रुग्णालय तयार करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचना

64

नागपूर : जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी दिलेल्या इशाºयानुसार कोरोनाच्या तिसºया लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता अधिक आहे. हे लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेने त्यादृष्टीने तयारी सुरू करावी. एका ठिकाणी २०० बेड्सची व्यवस्था होईल,असे एक आदर्श बाल रुग्णालय तयार करावे, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस [ devendra fadanvees ] यांनी केली. तसेच, त्यांनी यासाठी आवश्यक त्या सर्व वस्तूंची पूर्तता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले. कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांची स्क्रीनिंग करण्याचे आणि त्यांच्याकडून बुरशीच्या लक्षणाविषयी माहिती प्राप्त करण्याची सूचना केली.

कोरोनामधून बºया झालेल्या रुग्णांमध्ये सध्या म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराचा प्रसार होत आहे. तो वेगाने पसरण्याआधी तातडीने रुग्ण शोधण्यासंदर्भात मनपाने काय पावले उचलली आहेत, शिवाय कोरोनाच्या तिसºया लाटेशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने काय तयारी चालविली आहे, याचा आढावा घेण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील कोरोना वार रूमधून मंगळवारी आॅनलाईन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी सहभागी झाले होते.

म्युकरमायकोसिसच्या [ mucormycosis ]  वाढत्या प्रभावाबद्दल माहिती देताना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, सध्या हा रोग वेगाने वाढत आहे. एक महिन्यांपूर्वी कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांवर स्टिराईडच्या अतिवापरामुळे आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये काळी बुरशी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांना कोरोना नियंत्रण कक्षातून काळी बुरशीच्या लक्षणांविषयी फोन करून विचारणा करण्यात येईल. कुणामध्ये लक्षणे आढळल्यास ४८ तासांच्या आत मनपाची चमू पोहोचेल. काही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष शिबिरांचेही आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. रुग्णांचा शोध, लवकर निदान आणि तातडीने उपचार ही त्रिसूत्री मनपा प्रशासन अंमलात आणत आहे. तिसºया लाटेसाठी तयारीच्या दृष्टीने पाचपावली, के.टी.नगर, इंदिरा गांधी रुग्णालयात किमान १०० बेड्स लहान मुलांसाठी तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.