Home उपराजधानी नागपूर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र शोभणे

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र शोभणे

21

नागपूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 29 सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भातील घोषणा मराठी भाषा विभागाने नुकतीच एका शासन निर्णयान्वये केली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे : डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रवीण बांदेकर, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे,  फ.मु.शिंदे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. रवींद्र शोभणे,  योगेंद्र ठाकूर,  प्रसाद कुलकर्णी,  प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील,  पुष्पराज गावंडे , विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील,  दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर,  नवनाथ गोरे, रवींद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे,  उत्तम कांबळे,  विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here