Home खास बातम्या
12
सीबीआयच्या महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती

नवी दिल्ली : सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या महासंचालकपदावर वर्णी लागली आहे. मागील अनेक दिवसांपासून सीबीआयचे प्रमुखपद रिक्त होते. दोन वर्षांसाठी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जयस्वाल 1985 च्या तुकडीचे पोलिस अधिकारी असून, अनेक दिवसांपासून त्यांचे नाव सीबीआय महासंचालक पदासाठी चर्चेत होते.

सोमवारी सीबीआय संचालकांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त समितीमध्ये लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली होती.

***

नागपुरातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये संचालक पदाच्या निर्मिती प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली : नागपूर येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामधे संचालक पदाच्या निर्मिती प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गृहमंत्रालयाच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणामध्ये होणाºया नव्या नियुक्तीमुळे संघटनेचा कारभार आता वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी पाहणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ५ हजारांपेक्षा अधिक कर्मचाºयांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.

***

सोन्याच्या दागिन्यावर हॉल मार्किंगला १५ जून पासून प्रारंभ

नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जूनपासून प्रारंभ होणार आहे. कोविड महामारीमुळे प्रक्रियेला काहीसा उशीर झाला. सोन्याच्या दागिन्यांची भारतीय मानकं जगात सर्वोत्तम असावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या देशात तयार झालेल्या फक्त ३० टक्के दागदागिन्यांना हॉलमार्कचं प्रमाणपत्र असते. या कामाच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी एका दूरदृश्य कार्यक्रमामध्ये घेतला.

***

स्टेट बँक १ जुलैपासून बचत खातेधारकांना नवे सेवा शुल्क लागू करणार

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेने १ जुलै २०२१ पासून बचत खातेधारकांसाठी नवे सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे हे नवे दर एटीएममधून पैसे काढणे, चेकबुक, ट्रान्सफर यावर लागू होणार आहेत. एटीएममधून एका महिन्यात चार वेळा मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यास त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांना १५ रुपए आणि जीएसटी असे शुल्क द्यावे लागेल. तर चार मोफत व्यवहारानंतर सर्वच एटीएम आणि शाखेतून केलेल्या व्यवहारावरही शुल्क आकारले जाईल, असे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here