प्रतिकात्मक छायाचित्र

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू

राजधानी मुंबई

मुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून, या सत्रासाठी प्रवेश घेण्यासाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या [ FISHRY TRAINING INSTITUTE ] वतीने करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे प्रशिक्षण वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते. त्यानुषंगाने सन 2021-22 या चालू वर्षातील 1 जुलै  ते 31 डिसेंबर 2021 या सहा महिन्यांच्या कालावधीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी, प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क 450 रूपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा 100 रूपये एवढे आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी विहीत अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वसोर्वा, मुंबई -61 येथे 21 जून 2021 पर्यत सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *