सीबीएसई बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द

उतर महाराष्ट्र राष्ट्रीय

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द [ HSC CBSE EXAMINITION CANSELLED ] करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शैक्षणिक तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली़ यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांचे आरोग्य ही प्राथमिकता आहे. कोरोना महामारी वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. आपण मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

याशिवाय काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांकडूनही परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने होत आहे. कोरोना साथीच्या काळात आॅफलाइन परीक्षांच्या माध्यमातून मुलांना संसर्ग होण्याचा धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच परीक्षांचा निर्णय केंद्र पातळीवर एकच घेण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्र शिक्षण विभागाने यंदाची (2020-21) दहावीची परीक्षा होणार नसल्याचे आधीच जाहीर केले़ आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील बारावीचीही परीक्षाही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *