नागपूर शहरावरील आभाळात असे ढग दिसून आले.

मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

पश्चिम महाराष्ट्र

सातारा : जिल्हा मुख्यालयासह मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. फळ आणि भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळ आभाळ दिसून आले.

अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे बागायतदारांचे नुकसान होत आहे. कराड तालुक्यात वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, जोरदार पाऊस कोसळला. कराडमधील रुग्णालयात पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. यासह कराड मलकापूर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने कराड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोना रुग्णावर उपचार सुरू असलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये शिरल्याची माहिती आहे.

याशिवाय वसई तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, मंगळवारी संध्याकाळपासून शहरी तसेच ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. जोरदार पावसामुळे काही मिनिटांतच शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्ते जलमय झालेले दिसून आले.

भारतीय हवामान खात्यानुसार, पुढील दोन दिवसांत केरळात मान्सून दाखल होणार आहे. 21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला आहे. केरळात 31 मे पर्यंत नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता होती. मात्र दक्षिणेकडील वाऱ्याच्या स्थितीमुळे 3 दिवस उशीरा मान्सून दाखल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *