Home उपराजधानी नागपूर दोन आठवडे कोरोना निर्बंध शिथिल, परंतु सतर्कता गरजेची..

दोन आठवडे कोरोना निर्बंध शिथिल, परंतु सतर्कता गरजेची..

35

नागपूर : वाढत्या कोरोना संसगार्मुळे नागपूर शहरात लागू असलेल्या निर्बंधांमध्ये १ ते १५ जून अशा दोन आठवड्याच्या कालावधीत शिथिलता देण्यात आली आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये नागपूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची [  CORONA SITUATION IN NAGPUR ] संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ वाजतादरम्यान परवानगी होती. आता १५ जूनपर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहतील. तसेच, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने जी मॉल अथवा शॉपिंग सेंटरमध्ये नाही, अशी सर्व स्टँड अलोन दुकाने शनिवार, रविवार वगळता सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातील पाच दिवस सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेमध्ये सुरू राहतील. याशिवाय यापूर्वी मनपाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांमध्ये जी शिथिलता देण्यात आली होती ती कायम राहिल, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले आहे.

मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

शेतीसंबंधित सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरेंट, वाईन शॉप यांच्या घरपोच सेवेसाठीच परवानगी असून, सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत या सेवेस परवानगी दिली आहे. सर्व शासकीय कार्यालयांना २५ टक्के क्षमतेच्या उपस्थितीने परवागी आहे. सर्व खासगी कार्यालये बंद राहणार असून, वकील व चार्टर्ड अकाउंटंट यांचे खासगी कार्यालय यासह अत्यावश्यक सेवेशी निगडीत खासगी कार्यालयांना १५ टक्के उपस्थितीमध्ये परवानगी आहे. अत्यावश्यक व अन्य वस्तूंच्या सेवेसाठी ई-कॉमर्स सेवेला सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत परवानगी राहिल. लग्न व तत्सम समारंभांना २५ लोकांच्या उपस्थितीत केवळ दोन तासांची परवानगी कायम आहे. वैद्यकीय सेवा, गॅस एजन्सी, पेट्रोल पम्प, मालवाहतूक आदी सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा; ‘एसईबीसी’तील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ

मात्र, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मुखावरण (मास्क), सॅनिटायजर, गर्दी टाळणे, योग्य अंतर राखणे हा मंत्र पाळणे अनिवार्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागणूक ठेवण्याची सूचना आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केली आहे.