Home उपराजधानी नागपूर नागपुरात आज ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण

नागपुरात आज ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण

16

नागपूर : राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना गुरुवार, ३ जून रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोज दिला जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही डोज देण्यासाठी लस उपलब्ध करून दिली आहे. कोव्हिशिल्ड लस सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे.

केंद्र शासनाच्या नव्या निर्देशानुसार ज्या नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे, त्यांना दुसरा डोज दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रन्टलाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच, ड्राईव्ह ईन वॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत होईल. तसेच, ‘लसीकरण आपल्या परिसरात’ मोहिमे अंतर्गत सुद्धा कोव्हिशिल्ड लस दिली जाईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थनगर, आशिनगर झोनमागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा. महाल रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिन चा फक्त दुसरा डोज उपलब्ध आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here