Home अनुपमा... महिला विश्व सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा नवा ‘सूर’, राजकारणात प्रवेश

सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा नवा ‘सूर’, राजकारणात प्रवेश

84

मैत्रिणींनो, आपण सर्वजण सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांना जाणतोच़ कारण त्या आपल्या विदर्भातील हिंगणघाट येथील रहिवासी आहेत. आपले संगीतामधील करिअर करण्यासाठी त्यांनी मुंबईत धाव घेतली. संगीत क्षेत्रात स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी आता राजकारणाकडे पाऊल टाकले आहे. काल गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. चित्रपट व सांस्कृतिक विभागात सहभागी झाल्या असून, त्यांची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

वैशाली भैसने-माडे या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने असे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव याठिकाणी २४ आॅगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांना गायनाची आवड होती़ अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी यश मिळवल्याचे पाहावयास मिळते. मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून, भारतरत्न लतादीदी मंगेशकर व आशा भोसले यांची त्या चाहती आहे.

वैशाली दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या सारेगमप कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप शो मध्ये देखील विजेतेपद मिळवले. याशिवाय वैशाली यांनी मराठी बिग बॉसच्या दुसºया पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा गाण्यासाठी त्यांनी स्वर दिला आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

आता त्यांच्या नव्या प्रवासासाठी आपल्या विदर्भातील लेकीला शुभेच्छा देऊयात…

लेखन
अवनी