Home राजधानी मुंबई माझी वसुधंरा अभियान’ स्पर्धेत राज्यात नाशिक विभागाचे वर्चस्व; विभागाला एकूण १९ पुरस्कार

माझी वसुधंरा अभियान’ स्पर्धेत राज्यात नाशिक विभागाचे वर्चस्व; विभागाला एकूण १९ पुरस्कार

26

नाशिक : कोरोनासारख्या संकटात देखील नाशिक विभागाने माझी वसुधंरा [ mazi vasundhara ]  अभियान 2021-21 यशस्वी केले आहे. या स्पर्धेत 31 पुरस्कारापैकी नाशिक विभागाला एकूण 19 पुरस्कार प्राप्त झाले आहे. यामध्ये राज्यात माझी वसुधंरा अभियानाची सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या नाशिक विभागाचा गौरव करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऑनलाईन सन्मान सोहळ्याचे आयोजन मंत्रालय,मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार विभागीय आयुक्त श्री.गमे यांना प्रदान करुन नाशिक विभागाचे कौतुक करुन अभिनंदन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन व पर्यावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर उपस्थित होते. नाशिक विभागातून दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नाशिक जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, उपायुक्त अरविंद मोरे, नगर विकास विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे उपस्थित होते.

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत विभागातील तीन जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या वैयक्तिक गटातील पुरस्कारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना प्रदान करण्यात आला. तर तृतीय क्रमांकाचे परितोषिक नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना प्रदान करण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे तिन्ही पुरस्कार नाशिक विभागाला

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी या  वैयक्तिक गटात तिन्ही पुरस्कार नाशिक विभागाला प्रदान झाले आहे. यामध्ये प्रथम पुरस्कार जळगांव मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. द्वितीय पुरस्कार अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना तर तृतीय पुरस्कार नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना प्रदान करण्यात आला आहे.

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अमृत शहर

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत एकूण 43 शहरांनी अमृत शहरे म्हणून सहभाग घेतला होता. यामध्ये नाशिक महानगरपालिकेला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नगरपरिषद

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत एकूण 222 नगरपरिषंदानी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट नगरपरिषद गटातील 5 पुरस्कारांपैकी नाशिक विभागाला दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जळगांव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषदेला प्रदान असून उत्तेजनार्थ द्वितीय विभागून पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषदेला प्रदान झाला आहे.

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नगरपंचायत

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत एकूण 130 नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट नगरपंचायत गटातील पाच पुरस्कारांपैकी नाशिक विभागाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व द्वितीय पुरस्कार कर्जत नगरपंचायतीला प्रदान झाला आहे. उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील निफाड नगरपंचायतीला तर उत्तेजनार्थ द्वितीय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचातीला प्रदान झाला आहे.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचे पाचही पुरस्कार नाशिक विभागाला

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत 291 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटातील पाचही पुरस्कार नाशिक विभागाला प्रदान झाले आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसंवत या ग्रामपंचायतील प्राप्त झाला आहे. द्वितीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगांव ग्रामपंचायतीला तर तृतीय पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील चिनावल या ग्रामपंचायतीला प्रदान झाला आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील पहूरपेठ व उत्तेजनार्थ द्वितीय अहमदनगर जिल्ह्यातील लोणी ब्रदुक ग्रामपंचायतीला प्रदान झाला आहे.