Home उपराजधानी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकले दोन शासकीय कर्मचारी

लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकले दोन शासकीय कर्मचारी

13

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दोन शासकीय कर्मचारी अडकल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेतील तक्रारदार हे इंदिरामाता नगर, हिंगणा रोड नागपूर येथील रहिवासी असून, व्यवसायाने आॅटोचालक आहे. तक्रारदार 10 मे 2021 रोजी शंकरनगर चौकातून यू-टर्न करून सीताबर्डीकडे जात असताना समोरून येणाºया एका रुग्णवाहिकाने आॅटोला धडक दिली. यावेळी आॅटोचे खूप नुकसान झाले होते; परंतु रुग्णवाहिकाचालक व तक्रारदार यांच्यात तडजोड रुग्णवाहिकाचालक निघून गेला. मात्र, त्याठिकाणी उपस्थित वाहतूक शिपाई बिपिन महाजन यांनी तक्रारदार यांना आॅटोचे दोन हजार रुपयांचे चालान करून कारवाई केली. तसेच, तक्रारदारांकडे परवाना नसल्याने त्यांना आॅनलाईन 200 रुपयांचे अनपेड चालान देत कार्यालयात भरण्यास सांगितले. तसेच, महाजन यांनी तक्रारदार यास 500 रुपये दे नाही तर तुझा आॅटो जिथे दिसेल तेथून उचलून दोन हजारांची कारवाई करण्याची धमकी देत 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली

पोलिस उपअधीक्षक नरेश पारवे यांनी तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा रचला. यानंतर महाजन यांनी 500 रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शंविल्याने पथकाने आज, 8 जून 2021 रोजी ताब्यात घेऊन प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर (लाप्रवि नागपूर परिक्षेत्र), अपर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक नरेश पारवे (लाप्रवि नागपूर), नापोशि लक्ष्मण परतेती, भागवत वानखेडे, सचिन किन्हेकर, चालक शारीक शेख यांनी केली.

महानगरपालिकातील वरिष्ठ लिपिकही जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज महानगर पालिकाच्या धरमपेठ येथील आरोग्य विभागातील नागपूर येथील वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (55 वर्षे) यांनी 10 हजार लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने [ anti corruption bureau ] रंगेहात पकडले.

यातील तक्रारदार पारडी (भंडारा रोड नागपूर) येथील रहिवासी असून, त्यांचे पती महानगरपालिकाच्या आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले असून, ते सतत आजारी असल्याने त्यांनी तक्रारदार यांना निवृत्ती वेतनासंबंधी माहिती घेण्याकरिता आरोग्य विभागात पाठवले होते. तक्रारदारांनी वेतन व पेन्शनसंबंधी कामकाज पाहणारे वरिष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये यांच्याकडे रकमेबाबत विचारणा केली. यावेळी गजभिये यांनी तक्रारदारास सुट्यांची रक्कम काढून देण्याकरिता 10 हजारांच्या लाचेची मागणी केली; परंतु तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गजभियेविरुद्ध तक्रार नोंदविली.

पोलिस उपअधीक्षक योगिता चाफले यांनी तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. गजभिये यांनी तक्रारदारास 10 हजारांच्या लाचेची रक्कम स्वत: धरमपेठ झोन क्र. 2 येथील कार्यालयात स्वीकारल्याने त्यांना पथकाने रंगेहात पकडले. तसेच, त्यावरून अंबाझरी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर (लाप्रवि नागपूर परिक्षेत्र), अपर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक योगिता चाफले, नापोशि रविकांत डहाट, अमोल मेनघरे, आचल हरगुळे, मपोशि अस्मिता मेश्राम, प्रिया नेवरे यांनी केली़.

या बातमीकडे दुर्लक्ष नको :

बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
राज्यातील बंद कारखान्यांबद्दल सरकारची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here