Home रानशिवार आध्यात्मिक ….. गाण्यांतून गुणगान श्री विठ्ठलाचे

आध्यात्मिक ….. गाण्यांतून गुणगान श्री विठ्ठलाचे

108

संजय मुंदलकर, नागपूर

विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यत: महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वंदली जाते. विठोबा हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे;परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्ठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटी कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवतात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.
याच पंढरीचे विठ्ठल हे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते,भक्तीगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. राम मराठे, भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रकाश घांग्रेकर, मन्ना डे, लता मंगेशकर, वसंत आजगावकर, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल, विठ्ठल शिंदे,रामदास कामत यासारख्या गायकांनी ती गायली आहे.
अगा वैकुंठीचा राया (नाटक-संत कान्होपात्रा),अणुरेणुया थोकडा (रचना-संत तुकाराम, संगीत-राम फाटक),अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग (संगीत : राम फाटक),अवघा रंग एक झाला,अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर (रचना-अशोकजी परांजपे,नाटक-गोरा कुंभार),आधी रचली पंढरी (रचना-संत नामदेव),आता कोठे धावे मन (संगीत-राम फाटक),कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (नाटक-गोरा कुंभार),खेळ मांडियेला वाळवंटी ठायी,चंद्रभागेच्या तीरी, उभा मंंिदरी (रचना-दत्ता पाटील), चल गं सखे चल गं सखे पंढरिला,चला पंढरीसी जाऊ,जन वजन झाले आम्हा,पाउले चालती पंढरीची वाट (रचना -दत्ता पाटील,संगीत-मधुकर पाठक),पांडुरंग कांती दिव्य तेज झळकत…कानडा हो विठ्ठलू करनाटकू (रचना-संत ज्ञानेश्वर, स्वर-आशा भोसले, संगीत – हृदयनाथ मंगेशकर) यासारख्या भक्तीगीतांतून आपली आर्तता वर्तवली आहे.

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता,पावलों पंढरी वैकुंठभुवन, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (रचना-ग.दि. माडगूळकर, चित्रपट-प्रपंच),बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ज्ञानियांचा राजा (संगीत – राम फाटक)़, आनंदाचे डोही आनंद तरंग,आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,आली कुठूनशी कानी, टाळ-मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल (रचना-सोपानदेव चौधरी), इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (रचना-ग. दि. माडगूळकर,संगीत-पु.ल. देशपांडे, चित्रपट-गुळाचा गणपती, राग-भीमपलास), एकतारी संगे एकरूप झाला, कानडा हो विठ्ठ्लू करनाटकू तेणे मज लावयला वेधू,कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (चित्रपट-झाला महार पंढरीनाथ),काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (संगीत-राम फाटक) अशा कित्येक भक्तीगीतांतून रचनाकारांनी भाविकांच्या विठ्ठलाप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विठ्ठल…! विठ्ठल…!! विठ्ठल…!!!

*****