Home राष्ट्रीय वाहनांचा वेग आवरेना, टेम्पो-खासगी बस अपघातात 17 मृत्युमुखी

वाहनांचा वेग आवरेना, टेम्पो-खासगी बस अपघातात 17 मृत्युमुखी

22

कानपूर : उत्तरप्रदेशातील कानपूर येथे भरधाव टेम्पो, खासजी बस आणि अन्य एका वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन वाहनांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

माहितीनुसार, कानपूर-इटावा महामार्गावर भरधाव बसला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. यावेळी दोन्ही वाहने नियंत्रित होऊन पलटी झाली. अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 18 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

पोलिस अधिकारी मोहित अग्रवाल यांच्यानुसार, दुर्घटनाग्रस्त ट्रॅव्हल्स बस कानपूर येथून अहमदाबादकडे जात होती. साचेंदी येथील बिस्कीट कारखान्यात काम करणारे कर्मचारी टेम्पोतून कामाच्या ठिकाणाकडे प्रवास करत होते; परंतु त्यापूर्वी त्यांना प्राण गमावावा लागला. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त करत आर्थिक मदतीची घोषणा केली.