GOOD NEWS : नागपुरात कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी

उपराजधानी नागपूर

नागपूर : कोरोना महामारीने दुसºया लाटेत बाधितांचा उच्चांक गाठला होता. मार्च आणि एप्रिल महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी अत्यंत वाईट ठरला. २९ मार्च रोजी नागपूरचा पॉझिटिव्हिटीचा दर ४५.२ टक्क्यांपर्यंत गेला होता. केवळ दोन महिन्यात पॉझिटिव्हिटी दराने नीचांक गाठला असून, आता हा ५ टक्के पेक्षा कमी आहे.

महाराष्ट्र शासनाने हा दर ग्राह्य धरून निर्बंध शिथिल केले आहे. मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने यावर आता नियंत्रण मिळविले आहे. ते सुद्धा कोरोना चाचणी कमी न होऊ देता. शहर आणि जिल्ह्यात आता सुद्धा ८००० पेक्षा जास्त चाचणी होत आहे. नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात कोरोनाची चाचणी केल्यास हा दर कमी ठेवण्यात मदत मिळू शकते. हा दर वाढला तर पुन्हा: निर्बंध लावले जाऊ शकतात.

सध्या नागपूर शहर आणि जिल्हा मिळून आठ हजारांच्यावर कोरोना चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये बाधितांची सर्वाधिक संख्या होती. नागपूर शहर आणि जिल्हयात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर ४ एप्रिल रोजी ४२.५ टक्के, ११ एप्रिल रोजी ४२.४४ टक्के आणि ६ एप्रिल रोजी ४१.१७ टक्के इतका नोंदविला गेला होता. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचणीची संख्या वाढविली. शासकीय, मनपा आणि खाजगी रुग्णालयात बाधितांना दाखल होण्यासाठी बेड्सची संख्या वाढविण्यात आली. नागपूर आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक आॅक्सिजन बेड्स, आय.सी.यू. बेड्स आणि व्हेंटीलेटर्स बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी यांनी यंत्रणेला सातत्याने मार्गदर्शन केले. नागपुरात आॅक्सिजन, व्हेंटीलेटर्स, औषधी आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वांचे योगदान मोलाचे ठरले.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ४५.२ टक्क्यांवर गेलेला पॉझिटिव्हिटी दराचा आलेख अत्यंत खाली घसरला आहे. जून महिन्यात पॉझिटिव्हिटी दर सातत्याने खाली घसरत आहे. १ जूनला २.७ टक्के, २ जून ला २.२६ टक्के, ३ जूनला २.२८ टक्के अशा प्रकारे पौझिटिव्हिटी दर नोंदविला गेला. आता हा सतत ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

नागपुरात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने महामारीच्या दुसºया लाटेवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी दर [ CORONA POSIVITY RATE ] आणि आॅक्सिजन बेड्सची उपलब्धता यावरून जिल्ह्यांना पाच स्तरांमध्ये विभागले आहे. ज्यात नागपूरचा समावेश पहिल्यास्तरातील शहरांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले आहे तरी अजूनही नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क [ MASK ] ही त्रिसूत्री पाळणे बंधनकारक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांना कोव्हिड संदर्भात असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *