Home BREAKING NEWS केंद्र सरकार योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत : जावडेकर

केंद्र सरकार योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत : जावडेकर

23

DELHI CAPITAL : योग हा निरोगी आणि आनंदी आयुष्याचा मार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार समाजाच्या सर्व क्षेत्रात योगाभ्यासाचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ( PRAKASH JAVADEKAR ) यांनी दिली.

येत्या २१ जून रोजी नियोजित सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एका विशेष आॅनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनेक नामवंत योगगुरु आणि योग अभ्यासकांसह केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू उपस्थित होते. आपल्या वैयक्तिक हितासाठी तसेच मानवतेच्या कल्याणासाठी जागतिक समुदायाने योगाभ्यासाचा अवलंब करावा, असे आवाहनही जावडेकर यांनी केले. आयुष मंत्रालयाने मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेच्या सहकार्याने हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.

***

वाहनचालक प्रशिक्षणासंबंधी नवी अधिसूचना

DELHI CAPITAL : वाहनचालकाचे प्रशिक्षण देणाºया अधिस्वीकृतीधारक संस्थांकरीता अनिवार्य नियम विशद करणारी अधिसूचना केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. येत्या १ जुलैपासून ती लागू होईल. अशा संस्थांकडे स्वत:चा वाहन रपेटीचा मार्ग, आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक संगणक आणि इतर यंत्रसामुग्री असणं बंधनकारक आहे. अशा प्रशिक्षण केंद्राची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वाहन चालक परवान्यासाठी परिवहन कार्यालयाची ( R T O ) चाचणी देण्याची गरज राहणार नाही. कुशल, प्रशिक्षित वाहनचालकांचा अभाव हे रस्तेअपघातांचे महत्त्वाचे कारण असल्याने या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

 

***

देशभरात २८,४७३ टनांहून जास्त आॅक्सिजनचा पुरवठा

मुंबई : भारतीय रेल्वेगाड्यांनी देशभरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला २८ हजार ४७३ टनांहून जास्त आॅक्सिजन ( OXYGEN ) आतापर्यंत पोहचवला आहे. देशातल्या पूर्वेकडील राज्यांमधून ४०० आॅक्सिजन एक्सप्रेसद्वारे १५ राज्यांना हा द्रवरूप जीवनरक्षक वायू पुरवण्यात आला. राज्यात २४ एप्रिल रोजी पहिली आॅक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली होती. कोरोना संसर्ग वाढल्याचे प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने विमानसेवासह भारतीय रेल्वेद्वाराही या जीवरक्षक प्राणवायूची वाहतूक करण्यात आली.