Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र यंदा आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्या

यंदा आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्या

56

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी एकादशीची वारी पायी न होता बसनेच होणार आहे. वारीसाठी दहा मानाच्या पालख्या वीस बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली.

आषाढी वारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दहा मानाच्या पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एकूण १०० लोकांना तर इतर आठ पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
वाखरीपर्यंत हा पालखी सोहळा बसने जाईल. तिथून पुढे चालत दीड किलोमीटर प्रातिनिधिक पायी वारी करायला परवानगी देण्यात आली आहे. तसेच, गेल्या वर्षीप्रमाणे शासकीय महापूजा पाच जणांच्या उपस्थितीत होणार आहे. रिंगण आणि रथोत्सवासाठी केवळ १५ वारकºयांना परवानगी देण्यात आली आहे.

STAND ALONE PHOTO :महिला पथकाकडून मालवाहतूक करणाºया गाड्यांची सखोल तपासणी
परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी : प्रा.वर्षा गायकवाड

दरम्यान, मुख्य मंदिर भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच राहणार आहे. सर्व सहभागी वारकºयांना वैद्यकीय चाचणी बंधनकारक केली आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.