कोरोनावरील औषधींला जीएसटी सवलत

राष्ट्रीय

नवी दिल्ली : कोरोना आजारातील उपचारांसाठी लागणाºया अनेक औषधींना आणि उपचार सुविधांना वस्तू आणि सेवाकरात सुट देण्याच्या मंत्रिगटाने केलेल्या शिफारशी झालेल्या वस्तू आणि सेवाकर परिषदेत (GST GOVERNING COUNSIL) स्वीकारल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन [ NIRMALA SEETARAMAN ] यांनी पत्रकार परिषदेत सदर घोषणा केली.

काळ्या बुरशीच्या उपचारात वापरण्यात येणारे एमफोटेरिसिन-बी आणि संसर्ग रोखणाºया टोसिलिजमैब या औषधांना जीएसटी कराच्या सूचीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. रेमेडिसिविर इंजेक्शनवरील जीएसटी बारा टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणला असून, आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या उपचारातील अन्य काही औषधांचा जीएसटी पाच टक्के करण्यात आला आहे.

वैद्यकीय उपचारासाठी लागणारा आॅक्सिजन आणि इतर उपकरणांबरोबरच आॅक्सिमिटर आणि सँनिटायझरवरील वस्तू आणि सेवाकर पाच टक्के करण्यात आला आहे. विद्युत आणि गॅस शवदाहिनीवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. जीएसटी परिषदेची ही ४४ वी बैठक होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *