Home राष्ट्रीय मोदींचा जगाला नवा मंत्र, एक पृथ्वी … एक आरोग्य

मोदींचा जगाला नवा मंत्र, एक पृथ्वी … एक आरोग्य

21

नवी दिल्ली : भविष्यात उद्भवणाºया महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी [ Prime Minister Modi] यांनी केले आहे.
ते शनिवारी जी-सेवन देशांच्या शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना बोलत होते.

लोकशाही आणि पारदर्शक समाजांच्या विशेष जबाबदाºयांच्या मुद्यांवर भर देत एक पृथ्वी, एक आरोग्य [ ONE EARTH, ONE HEALTH ] हा संदेश संपूर्ण जगाकडे जाणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या महामारीविरुद्ध भारताचा दृष्टीकोन मांडताना मोदी म्हणाले, की सरकार, उद्योग आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्यास्तरावर समन्वय राखत प्रयत्न केले. त्याचबरोबर बाधित लोकांचा शोध तसच लसीकरण व्यवस्थापनासाठी भारताने डिजिटल मीडियाच्या यशस्वीरित्या उपयोगातून हेतू साध्य केला. भारत आपला अनुभव आणि कौशल्य इतर विकसनशील देशांशी सामायिक करण्यास तयार असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.