Home राजधानी मुंबई आयुष मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी जारी केल्या अशा नियमावली…कोणत्या ते वाचा

आयुष मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी जारी केल्या अशा नियमावली…कोणत्या ते वाचा

57

मुंबई : देशात कोरोनाच्या तिसºया लाटेचा धोका असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाने लहान मुलांसाठी नवी नियमावली (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. यात योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यासह योगा करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

देशभरात कोरोनाच्या दुसºया लाटेचा धोका कमी अर्थात रुग्णसंख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, त्याचवेळी तिसºया लाटेचाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे;परंतु पालकांनी न घाबरता मुलांची काळजी घेण्याचे आवाहन आयुष मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार मुलांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, 4 ते 5 दिवस ताप कायम असणे, जेवण कमी होणे चिडचिड, आॅक्सिजनची पातळी 95 टक्क्यांहून कमी झाल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. मधुमेह, हृदय, फुफ्फुसांचा आजारग्रस्त मुलांना कोरोना सर्वाधिक धोका असतो़ नवजात बाळाला आईचे दूध गरजेचे आहे. मुलांना वारंवार हात स्वच्छ धुवायला सांगा, घराबाहेर पडताना मुखावरण (मास्क) आवश्यक आहे. 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी मुखावरण लावल्यास पालकांनी लक्ष ठेवावे. मुलांसाठी नॉन मेडिकल किंवा तीन थर असलेला सुती कपड्याचे मुखाच्छादन योग्य आहे. गरज नसताना मुलांना घराबाहेर पाठवू नये. मुलांना व्हिडिओ कॉल किंवा फोनच्या माध्यमातून इतरांच्या संपर्कात ठेवावे. कोरोनाची लक्षणे () जाणवल्यास मुलांना वृद्धांपासून दूर ठेवावेत. मुलांकडून योगा करून घ्यावा.