Home राष्ट्रीय भारतीय नागरिक चिकन, मटण सेवनाकडे वळणार

भारतीय नागरिक चिकन, मटण सेवनाकडे वळणार

48

NON VEG : सध्याच्या कोरोना संकटात भारतीय लोकांचा प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या खाद्यपदार्थांकडे कल तीव्र वाढत आहे. आजच्या घडीला भारतीय कुटुंबे जेवणावर खर्च करतात, त्यापैकी एक तृतीयांश हिस्सा येत्या 2025 पर्यंत चिकन, मटण यासारख्या मांसाहारी खाद्यपदार्थांवर खर्च करतील, असे एका सर्वेक्षणात नमूद केले आहे.

आयुष मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी जारी केल्या अशा नियमावली…कोणत्या ते वाचा
फिच सोल्यूशन्स या फिच रेटिंग्जसंबंधी एका युनिटने तयार केलेला भारतीय कुटुंबांच्या अन्नखर्चासंदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. मागील 20 वर्षात लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याने लोकांच्या प्रथिनयुक्त अन्नाचे आकर्षणात वाढ झाली आहे. अहवालानुसार, 2025 पर्यंत मांसाहारात 71 टक्के कोंबडीच्या मांसाचे सेवन केले जाईल. 2005 ते 2025 दरम्यान देशात दरडोई तांदळाचा वापर 70.4 किलोवरून 77.1 किलोपर्यंत होण्याची शक्यता आहे. पीठासारख्या खाद्यपदार्थावरील खर्च वार्षिक सरासरी 11.9 वाढू शकतो. दिी वृत्तपत्र अमरउजालाने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले आहे.