Home राष्ट्रीय मागील 12 महिन्यांत चिनी बनावटीचा कोणताही माल खरेदी नाही

मागील 12 महिन्यांत चिनी बनावटीचा कोणताही माल खरेदी नाही

70

नवी दिल्ली : मागील वर्षभरात भारतीय नागरिकांकडून चिनी मालावर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला आहे. यासंबंधी लोकल सर्किल्स या आॅनलाइन कंपनीने सर्वेक्षण केले आहे. सीमासंबंधी तणावामुळे मागील 12 महिन्यांत चिनी बनावटीचा कोणताही माल खरेदी [ CHINA BOYCOT ] केलेला नाही.

संबंधित कंपनीने 1 ते 10 जून या कालावधीत देशातील 281 जिल्ह्यांतील 17 हजार 800 नागरिकांकडून मते जाणून घेतली होती. दुसरीकडे चीनकडून झालेल्या जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय आॅक्सिजन उपकरणांच्या आयातीमध्ये वाढ झाल्यामुळे जानेवारी ते मे 2021 मध्ये चीनच्या वार्षिक आयातीमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतीय नागरिक चिकन, मटण सेवनाकडे वळणार

सदर सर्वेक्षणात ही बाब समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की मागील 12 महिन्यांत किती भारतीय ग्राहकांनी चीनमध्ये बनविलेले पदार्थ खरेदी केले. त्यास प्रतिसाद म्हणून 43 टक्के लोकांनी चीनमध्ये तयार केलेला कोणताही माल खरेदी केला नसल्याचे सांगितले. दरम्यान, जून २०२० मध्ये गलवान खोºया भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव कमालीचा वाढला आहे.

आयुष मंत्रालयाकडून लहान मुलांसाठी जारी केल्या अशा नियमावली…कोणत्या ते वाचा