Home उपराजधानी नागपूर कोरोना रुग्ण झाली खंडणीखोर, डॉक्टर दाम्पत्याला मागितले एक कोटी

कोरोना रुग्ण झाली खंडणीखोर, डॉक्टर दाम्पत्याला मागितले एक कोटी

90

नागपूर : श्रीमंत होण्याची महत्त्वाकांक्षा आणि बेईमानीवृत्ती जोपासत नागपुरातील मनीषनगर भागातील शीतल (काल्पनिक नाव) नामक महिलेने कोरोनातून ठीक केलेल्या डॉक्टरांना धमकी देत तब्बल कोटी रुपयांची खंडणी मागितली़. मात्र, बेलतरोडी पोलिसांनी तिला काही तासांत तुरुंगात पाठवले आहे. एखाद्या चित्रपटात शोभणारी ही कथा आहे.

शीतल आणि तिचा नवरा, या दोघांनी डॉ. तुषार पांडे आणि पत्नी डॉ. राजश्री पांडे यांच्याकडे सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनावर उपचार घेतले होते. यानंतर दोघेही बरे झाले. यावेळी शीतलला पांडे दाम्पत्याच्या श्रीमंतीचा अंदाज आला होता. त्यावरून तिने कारस्थान रचले. या कामात कुणाची मदत न घेता (मात्र अनेक चुका करत) आपला डाव तडीत नेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने पांडे यांना 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास कुरियरमधून पत्र पाठवले. तब्बल १ कोटीची खंडणी तिने मागितली आणि न दिल्यास दोन्ही मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिली. तसेच, एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे पत्र लिहिले. पांडे यांच्याकडून ते12 जून रोजी वाचण्यात आले. यानंतर तत्काळ पोलिसांना कळवले. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाल्याने पोलिसांनी वेगाने तपास केला आणि शीतलपर्यंत येऊन पोहोचले. यानंतर तिला अटक करण्यात आली.

नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर

माहितीनुसार, आरोपी शीतल ही स्वत: फॅशन डिझायनर असून, तिचा नवरा महिन्याला एक लाख रुपये कमावतो आहे; परंतु घरात राहून मोबाईलच्या नादी गेलेल्या शीतलला गुन्हेगारी वेबसीरिज (समाज माध्यमातील चित्रपटाचा नवा प्रकार) पाहण्याचा अतोनात छंद आहे. झटपट पैसा कमावण्यासाठी तिने हा खंडणीचा उद्योग केला.

SCHOOLOUT STUDENTS : शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार 

आरोपी शीतल हिला मोठा व्यवसाय करायचा होता. यासाठी तिला नवºयाकडून पैसा घेता आला असता. त्यासाठी कुणाच्या पैशांवर डोळा ठेवायची गरज नव्हती. मात्र, चोवीस तास हाताशी असलेल्या मोबाईलने तिला गुन्हेगारीकडे वळवले. त्यासाठी मोठी रिस्क घेतली़ शिक्षा भोगून ती घरात परत येईलही;परंतु तिची पत परत येऊ शकणार नाही.