Home BREAKING NEWS पितृदिन : आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या...

पितृदिन : आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या सर्वांचे सर्वोपरी पिता आहेत…

81

संत राजिंदरसिंह जी महाराज

पितृदिन हा एक असा दिवस आहे, जेव्हा आपण आपल्या वडिलांच्याप्रति विशेष सन्मान आणि आभार प्रकट करतो. हा एक असा दिवस पण आहे, जेव्हा आपण परमात्म्याची आठवण करतो, जे आपणा सर्वांचे पिता-परमेश्वर आहेत. या दिवशी आपण आपल्या वडिलांकडून मिळालेले प्रेम आणि भेटवस्तू यांची मनापासून आठवण करतो आणि आभार प्रकट करतो. ही एक अशीही वेळ आहे जेव्हा आपण पिता-परमेश्वराकडून आपल्या जीवनात ज्या समृद्धी मिळाल्या आहेत, त्याची आठवण करतो,तसेच त्यांचे आभार व्यक्त करतो.

पिता-परमेश्वरच आपले खरे पिता आहेत आणि ते सर्व प्रकारे आपली काळजी करतात. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांमध्ये ते सद्गुण तसेच नैतिक मूल्ये बघू इच्छितात, जे स्वयं त्यांच्यामध्ये असतात. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, की त्यांचा मुलगा किंवा मुलगी मोठं होऊन एक चांगली व्यक्ती बनावी.

पिता-परमेश्वर आपल्यापासून वेगळे नाही. हे आपले मन आहे जे आपल्याला पिता-परमेश्वरापासून दूर करते. परमात्म्याचा अंश, आत्मा प्रत्येक व्यक्तीत असतो . परमात्म्याने आत्म्यास स्वत:सारखेच बनवले आहे. संपूर्ण मानव जाती पिता-परमेश्वराच्या स्वरूपाच्या आधारावर बनवली आहे. पिता परमेश्वराची इच्छा आहे, की आपण प्रत्येकाने त्या महान प्रतिमेनुसार आपले जीवन जगावे, सद्गुण तसेच नैतिक मूल्य आपण धारण करावे.

पिता परमेश्वराची इच्छा आहे, की आपण फक्त त्यांच्याशीच नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या सृष्टीतील उपस्थित सर्व मानव तसेच अन्य प्राण्यांवर प्रेम करावे ,ह्याच उद्देशाने सृष्टीची निर्मिती केली गेली होती. असं बोललं जात की पिता परमेश्वराने समस्त मानव जातीला एकमेकांशी प्रेम व करुणेने व्यवहार करण्यासाठी बनवले आहे, नाहीतर जर पिता-परमेश्वराला फक्त स्वत:ची भक्तीच करून घ्यायची होती तर त्यासाठी फक्त देवदूतच पुरेसे होते. प्रभूने तरीपण मानवास बनवले कारण मानवांनी फक्त प्रभूशीच प्रेम न करता एकमेकांवर ही प्रेम करावे.

जी व्यक्ती आपल्या जोडीदार/बरोबरीच्या व्यक्तींना मदत करते, ती प्रभूस आवडते. आपल्या इच्छा व सुखांचा त्याग करूनही दुस?्यांना मदत करणे, हा विशिष्ट गुण परमात्म्यास खूप आवडतो आणि ज्याच्या अंगी हा सद्गुण असतो, ती व्यक्ती सुद्धा परमात्म्यास खूप आवडते. या धरती वर अब्जावधी आत्मे जगत आहेत . त्यातील बरीचशी लोकं स्वार्थी आणि बेजबाबदार जीवन जगत असतात. बºयाच लोकांना स्वनियंत्रणाच्या बाहेर जाऊन ही अधिकार, प्रतिष्ठा, सत्ता,मान सन्मान हवा असतो .याचा अर्थ असा आहे की ती लोकं प्रभूच्या विपरीत दिशेने चालले आहेत. खरंतर पिता-परमेश्वराची वास्तविक इच्छा अशी आहे की आपण फक्त त्यांच्याशीच नाही, तर सगळ्या व्यक्तींवर एक समान प्रेम करावे. जे लोक असे करतात,फक्त तेच खºया अर्थाने पिता-परमेश्वराची संतान आहेत.

‘पितृ-दिना’ च्या दिवशी आपण आपापल्या पित्यास सन्मान देण्याबाबत विचार करतो. त्याचबरोबर आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या सर्वांचे सर्वोपरी पिता आहेत. याची सर्वात चांगली पद्धत अशी आहे की आपण त्यांच्याद्वारे मिळालेल्या समृद्धी व प्रगती चे स्मरण करून त्यांचे आभार मानावे. दुसरे आपल्याला ज्या महान उद्देशासाठी हा मनुष्य जन्म मिळाला आहे, त्यास आपण पूर्ण करावा आणि अध्यात्मिक लक्ष्य प्राप्त करावे.

चला, आजच्या दिवशी आपण आपल्या शारीरिक पित्यास धन्यवाद देण्याबरोबर पिता-परमेश्वर, ज्यांच्या कडून आपल्याला या जीवनाचे सर्व उपहार प्राप्त झाले आहेत, त्यांचे मनापासून आभार प्रकट करूया.

*****