Home उपराजधानी नागपूर कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. लोकं मात्र काहीही शिकले नाहीत…

कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. लोकं मात्र काहीही शिकले नाहीत…

141

नागपूर : संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनचे नियम अंशत: हटवण्यात आले आहे मात्र, या मोकळीकचा देशवासी मोठा फायदा घेत असून, पुन्हा गर्दी करत मुखावरणाचा (मास्क) वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षीच्या कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर यंदाच्या दुसºया लाटेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अशातच आता सरकारने काही निर्बंध दूर केल्यानंतर लोकांनी पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच तज्ज्ञांनी तिसºया लाटेची शक्यता वर्तवली आहे.

यासंदर्भात दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की, पुढील 6 ते 8 आठवड्यात (दीड ते दोन महिने) देशात पुन्हा कोरोना साथीचा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि या लाटेला थांबवणे अशक्य आहे. देशातील अधिकाधिक लसीकरण करून लोकांना कोरोनापासून सुरक्षित करणे हे महत्त्वाचे आहे. तसेच, कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे योग्य निर्णय असून, यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आला आहे. परिस्थिती पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, लोक अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असून, मुखावरण अर्थात मास्क वापरत नाहीत. शिवाय शारीरिक दूरतेचेही (सोशल डिस्टन्सिंग) पालन करत नाहीत. अर्थातच या सर्व प्रकारातून लोक पहिल्या आणि दुसºया कोरोना लाटेतून काहीच शिकले नाहीत, असे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बाबी

– मोकळीक मिळताच बाजरातील गर्दी वाढली
– रस्त्यावर विना मुखाच्छादनाची माणसे दिसून येतात
– वाहतूक सिग्नलवरील गर्दी वाढली आहे
– प्रत्यक्ष कामानिमित्त घराबाहेर पडणारी संख्या नगण्य आहे
– अनेकजण रस्त्यांवर विनाकारण दुचाकी आणि चारचाकीतून फिरत आहेत
– प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन नाही
– रस्त्यांवर थुंकण्याचे प्रमाण वाढले