Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य CINE rang ………द फॅमिली मॅन 2 मधील प्रियमणी

CINE rang ………द फॅमिली मॅन 2 मधील प्रियमणी

85

भारतीय चित्रपटक्षेत्रात दक्षिण भागातील चित्रपटाचे वेगळे स्थान आहे. मागील काही दिवसांत या प्रादेशिक चित्रपटांनी भरघोस यश मिळवले आहेत. तामिळ, कन्नड, तेलगू वा मल्याळीतील अभिनेत्री विशेषत्वाने प्रसिद्धीस आल्या आहेत. सावळा असला तरी आकर्षक वर्ण, शरीरयष्टी, उंची यामुळे त्या अभिनयातही यशाची मोठी शिखरे गाठत आहेत.

रमय्या कृष्णन्, अनुष्का शेट्टी, नित्या मेनन, श्रुती हासन, कीर्ती सुरेश, श्रिया सरण, सामंथा, तृष्णा कृष्णन्, अनुपमा परमेश्वरम्, नयनतारा, साई पल्लवी, यांच्याशिवाय राकुल प्रित सिंह, तमन्ना भाटीया, तापसी पन्नू, काजल अगरवाल, राशी खन्ना, हंसिका मोटवानी या हिंदीभाषिक अभिनेत्रींनी सुद्धा मोठे यश मिळवले आहे.

प्रियमणी [ PRIYAMANEE ] ही सुद्धा दक्षिणेतील अभिनेत्री… तामिळ, कन्नड, तेलगू चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती द फॅमिली मॅन 2 या सुपरहीट वेबमालिकेत झळकत आहे. या आधीच्या सिझनमध्येही ती होती. यात तिचा अभिनय उल्लेखनिय ठरला आहे.


प्रियामणीचे मूळ प्रिया वासुदेव मणी अय्यर असे असून, जन्म 4 जून 1984 ला कार्नाटकातील बंगळुरू येथे झाला. प्रियामणीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ती कांजीपुरम सिल्क साड्यासाठी सुरुवातीला मॉडेलिंग करत होती. प्रियामणीने मॉडेलिंग पासूनआपल्या करिअरला सुरुवात केली होती.

सन 2003 मध्ये तिने एका तेलुगू चित्रपटातून अभिनय सुरू केला. यानंतर तामिळ, मल्याळम चित्रपटांत भूमिका साकारल्या. रावण, चेन्नई एक्सप्रेस, अतित अशा हिंदीमध्येही झळकली होती. त्यामुळे प्रियामणी आता हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण करत आहे. (छायाचित्रे : इंटरनेट)

*****