Home प्रादेशिक विदर्भ अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी हालचालींना वेग

अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी हालचालींना वेग

56

अमरावती : अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने विमानतळाची कामे पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विमानतळाच्या अद्ययावतीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशनमोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबींसंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल व आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.

पालकमंत्र्यांनी आज सकाळी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला [ BELORA AIRPORT AMARAVTI ] भेट देऊन अधिकाऱ्‍यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे ( MADC ) मुख्य अभियंता एस. के. चटर्जी, रामेश्वर कुरजेकर, त्याचप्रमाणे ‘राईटस् लि.’ या कंपनीचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कीअमरावती हे विभागीय मुख्यालय आहे. त्यामुळे विमानतळाचे अद्ययावतीकरणाच्या कामाची जबाबदारी शासनाने ‘एमएडीसी’कडे सोपवली आहे. त्यानुसार विमानतळावर एटीआर-72 किंवा तत्सम प्रकारची विमाने येथे उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करण्यात येत आहे व येथे रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची सुविधाही निर्माण होणार आहे. या विमानतळाचा उडान (आरसीएस) या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत उडान 3.0 मध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमअंतर्गत अमरावती- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा मार्ग अलायन्स एअरलाईन्स यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरु होण्यासाठी मिशनमोडवर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे एमएडीसी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आवश्यक निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला जाईल. याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच होईल. एमएडीसीचे अधिकारीही उपस्थित असतील. आवश्यक तो सर्व निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

नाटक चळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री

एटीआर-72 विमाने उतरण्याची सुविधा व नाईट लॅडिंगच्या सुविधेसाठी विस्तारीकरणाची कामे करण्यासाठी ‘एमएडीसी’कडून ‘राईटस् लि.’ या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ‘राईटस् लि.’ ही कंपनी केंद्र शासनाचा उपक्रम असून, ती आरेखन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या संरक्षण, तसेच वने व पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली आहे.