Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा काव्याभिलाषा … सळसळत्या रक्ताचे… दोन जीव चालले होते

काव्याभिलाषा … सळसळत्या रक्ताचे… दोन जीव चालले होते

46
दोन जीव …

वेगास धरूनी हाती, वाºयाच्या वेगावरती
सळसळत्या रक्ताचे… दोन जीव चालले होते

बेफिकीर होती वृत्ती बेलगाम त्यांची कृती
न बाळगता कसलीच भीती…दोन जीव चालले होते

नुकतेच होते फुटले, तारुण्यास पंख त्यांच्या
गप्पा रंगवित स्वप्नांच्या… दोन जीव चालले होते

होता दबा धरूनी काळ मोठ्ठा आ करूनी
ही काळवेळ विसरूनी… दोन जीव चालले होते

रो री करीत जो आला, लोक टिप्पर म्हणती त्याला
विसरून त्याचा घाला… दोन जीव चालले होते

क्षणात उडाल्या चिंधड्या, थिजल्या किंकाळ्याही
मृत्यूवर उमटवित शाई … दोन जीव चालले होते

सरले नव्हते कोवळेपणही, जगले न पुरते जीवनही
अकालीच निरोप घेऊनी… दोन जीव चालले होते

अति धाडस अट्टहास वेडा, संयम असू दे थोडा
शिकवूनी जगास धडा…दोन जीव चालले होते

उज्ज्वला सुधीर मोरे
9552711968

(सर्वाधिकार सुरक्षित)

*****

पहिल्या पावसात

पहिल्या पावसात
भिजली धरती
उठला मृद्गंध
केले धुंद………..मनाला माझ्या

पहिल्या पावसात
आठवणी ताज्या
ओले नयन
भिजले क्षण………….सारे कसे

पहिल्या पावसात
साथीला सखा
मज लपेटला
शहारले यौवन………….मदहोश करी

संजय मुंदलकर
नागपूर

(सर्वाधिकार सुरक्षित)