Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र …म्हणून पंकजा मुंडेंनी आयोजित केले चक्काजाम आंदोलन

…म्हणून पंकजा मुंडेंनी आयोजित केले चक्काजाम आंदोलन

38

बीड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले असल्याने सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या २६ जून रोजी भाजपाच्या वतीने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

जिल्हा भाजपाच्या पदाधिकाºयांची आॅनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे दुर्दैवी असून, केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आरक्षण पुन्हा मिळवावे लागणार आहे. सरकारचा धिक्कार करत आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाहीत हा नारा देऊन २६ जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नमिता मुंदडा, खासदार प्रीतम मुंडे, सुरेश धस, लक्ष्मण पवार, राजेंद्र मस्के, भीमसेन धोंडे, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.