Home राष्ट्रीय तिसरी लाट दारावर, कोरोना नियमांचे पालन करण्याकडे साफ दुर्लक्ष

तिसरी लाट दारावर, कोरोना नियमांचे पालन करण्याकडे साफ दुर्लक्ष

76

नवी दिल्ली : देशासह जगातील महत्त्वाच्या आरोग्य क्षेत्रातील संघटनांनी यावर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरच्या सुमारास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने कोरोना विषाणू संसर्गाला संपवण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे; परंतु देशात मोठी प्राणहानी होऊनही काही समाजविघाक वृत्तीचे लोक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे.

या संदर्भात नीती आयोगाचे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले, की परिस्थिती अतिशय नाजूक असून लोकांनी शिस्त पाळण्याची गरज आहे. कोरोनाचे सर्व नियम देशवासियांकडून योग्य पद्धतीने पाळल्या गेल्यास आणि लसीकरण झाल्यास संभाव्य तिसºया लाटेचा धोका कमी करता येऊ शकते.
जगातील अनेक देशात दुसरी लाटसुद्धा आलेली नाही. आपण कोविडचे नियम नीट पाळले तर ही वेळ निघून जाईल. लोकांनी मुखावरण (मास्क) घालणे बंद केले, सामाजिक अंतर टाळले आणि इतर कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष केले तर येत्या सहा ते आठ आठवड्यांत तिसºया लाटेचा धोका नक्की येऊ शकतो, असा इशारा एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला होता.