Tapori Turaki … मग काय, मास्तरांनी बदड बदड बदडला…

टपोरी टुरकी ....Jocks for You

बंड्या काका : डॉक्टर, या प्रिस्किप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत.
डॉक्टर : अहो त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो.
बंड्या काका : अरे डॉक्टरच्या…त्या गोळीच्या नादात ७२ मेडिकल दुकान फिरलो ना मी!
तरी पाच दुकानवाले उद्या मागवून देतो म्हणाले, ते कसं काय…

***

पुणेरी पूजाने एकदा भगवान शंकराला प्रसन्न केले.
शंकर : मी प्रसन्न झालो आहे… एक वरदान माग.
पूजा : भगवंता मला तीन वरदान पाहिजेत…
शंकर : ठीक आहे देतो तीन वरदान; पण एका अटीवर, तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन.
पूजा : चालेल मला.

यानंतर

वरदान १ – मला भरपूर संपत्ती दे.
– दिली…
सासूला दहापट मिळाली.
वरदान २ – मला सर्वांत सुंदर बनव.
– बरं…
सासू दहापट सुंदर बनली.
वरदान ३ : मला एक हलका हार्टअटॅक दे.
– दिला…
सासूला दहापट अ‍ॅटक. धड धड धड…

***

प्रश्नपत्रिकेत शास्त्रीय कारणे द्या, असा प्रश्न होता.
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.
नारायणच्या मन्यानं लिहिलं,
कारण कोण झोपलयं ते कळत नाही.
मग काय, मास्तरांनी बदड बदड बदडला…

***

शिक्षक:15 फळांची नावे सांगा बरं.

नित्या : पेरू

शिक्षक : शाब्बाश

नित्या : आंबा

शिक्षक: गूड

नित्या : सफरचंद

शिक्षक: व्हेरी गूड. तीन झाले आणि बारा नावं सांग.

नित्या : एक डझन केळी.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *