Home राजधानी मुंबई सत्य लवकरच समोर येईल : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

सत्य लवकरच समोर येईल : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

50

मुंबई : अँटिलीया आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी परमबीर सिंग यांची संशयास्पद भूमिका असल्याने त्यांना आयुक्तपदावरून हटविल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. केंद्रीय तपास यंत्रणांना मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख [ ANIL DESHMUKH ] यांनी दिली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने (ED) अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. याशिवाय नागपुरातही ही कारवाई केली. यानंतर स्वत: अनिल देशमुख यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख म्हणाले, की आपणावर केलेले आरोप परमबीर सिंग यांना पदावरुन हटवण्यात आल्यावर केले होते. परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांना हटवण्यात आले़ यानंतरच आरोप केले. आयुक्तपदावरून असतानाच आरोप करायला हवे होते. वाझे, काझींसह पाचही अधिकारी हे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते, असेही त्यांनी सांगितले.