Home राष्ट्रीय न्यायालयाने महिलेची ती मागणी फेटाळली

न्यायालयाने महिलेची ती मागणी फेटाळली

32

प्रयागराज : पतीपासून जिवाला धोका असून आपल्याला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी करणाºया महिलेची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फे टाळून लावली आहे.

पतीकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक हिंसाचार होत असल्याचे कारण देत आपल्या मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहणाºया महिलेबाबत न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहे. न्यायालयात येण्यापूर्वी आपल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिलेने काय केले, असा सवाल उपस्थित केला. तसेच, विवाहित असताना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे, पतीविरोधात कुठलीही तक्रार न नोंदवणे याबाबत न्यायालयाने मोठे आश्चर्य व्यक्त केले.

विदर्भाच्या मातीतील बक्षीसप्राप्त ग्रामीण कथा : कमाई (भाग २)

पतीकडून यापूर्वी मारहाणीचे प्रकार घडले होते, तर तिने त्याविरोधात एकही पोलिस तक्रार का केली नाही. विवाहित असताना मित्रासोबत राहण्याचा निर्णय घेतला;परंतु घटस्फोटासाठी अर्जदेखील का सादर केलेला नाही, असे दोन मुख्य प्रश्न अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिच्यापुढे उपस्थित केले. समाधानकारक उत्तरे देता न आल्यामुळे पोलिस संरक्षण देण्याची महिलेची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

वीज दरात सबसिडी देण्यास शासन अनुकूल : ऊर्जामंत्री