Home राजधानी मुंबई हा इशाराच, पुढील पाच दिवसांत इतका पाऊस…

हा इशाराच, पुढील पाच दिवसांत इतका पाऊस…

39
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली असली तरील पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अति मुसळधार पावसाची शक्यता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नैऋत्येकडून येणाºया जोरदार वाºयांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये 1 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यात किनारपट्टी लगतच्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीही होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

न्यायालयाने महिलेची ती मागणी फेटाळली