Home राजधानी मुंबई राज्यात एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

राज्यात एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

33

मुंबई  : राज्यातील गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या  मोफत  शिवभोजन थाळी योजनेचा 1 कोटींहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. 15 एप्रिल ते 28 जून या काळात 1 कोटी 7 लाख 59 हजार 90 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

15 एप्रिल 2021 ते 14 जुलै 2021 पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. असा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने 17 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी ८६ लाख ९५ हजार ६८७ थाळ्यांचे वितरण झाले आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 332 शिवभोजन  केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात एकूण 1 हजार 68  शिवभोजन केंद्रे [ SHIVBHOJAN THALI ] सुरू आहेत. उर्वरित केंद्रे लवकरच सुरू होतील.

काव्याभिलाषा … काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात