कोरोनाचे संकट, पेट्रोल-डिझेल, दूध, बँकिंग व्यवहार आणि स्वयंपाकाचा गॅस

उपराजधानी नागपूर

नागपूर : मागील सव्वा वर्षांपासूनचा कोरोनाचा काळ, त्यात महागाईची छळ सर्वसामान्यांना अधिक तीव्र बसू लागली आहे. काही बँकांनी आपल्या ग्राहकांशी ‘व्यवहार’ बदलवला आहे. अमूल दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ झाली…पेट्रोलने तर शंभरी कधीच पार केली आणि कमी म्हणून की काय आता स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीनंतर आता सरकारी तेल कंपन्यांनीही एलपीजी सिलेंडरच्या (स्वयंपाकाचा गॅस) किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत 14.2 किलो सिलेंडर 809 रुपयांऐवजी 834.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यात कमी नव्हे तर 25.50 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, स्वयंपाकाचा गॅसमध्ये किंमतवाढ झाल्याने सर्वसामान्यांतून केवळ नाराजी व्यक्त होत आहे. कारण हातात काहीच नाही, असे हताश बोल अनेकांनी बोलून दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *