इयत्ता बारावी निकालासाठी 30.30.40 असा फॉर्म्युला

आरोग्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या संदर्भात मूल्यमापन पद्धत जाहीर केली आहे. त्यानुसार, बारावी निकालासाठी [ H S C 2021 RESULT ] सीबीएसई पॅटर्नचा वापर करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावीसाठी) मूल्यमापन कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून 30.30.40 असा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे.

इयत्ता दहावीमधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुणावर आधारित 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तसेच, अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन आतील विषयनिहाय गुण याचा 30 टक्के विचार केला जाईल़ इयत्ता बारावीमध्ये वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन आतील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या तसेच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण 40 टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मूल्यमापन प्रक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली.

यत्र तत्र सर्वत्र … खास बातम्या
काव्याभिलाषा … काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *