डॉ. निखिल चांदुरे यांची वैद्यकीय अधिकारी गट-अ पदावर निवड

यवतमाळ

यवतमाळ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. निखिल चांदुरे यांची अकोला येथे वैद्यकीय अधिकारी गट-अ, नेत्रचिकित्सक (विशेषज्ञ) या पदावर निवड करण्यात आली आहे.

डॉ. निखिल दत्ता चांदुरे यांनी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातून नेत्र विज्ञानशास्त्र शाखेत एम.एस.(मास्टर आॅफ सर्जन) ही पदवी प्राप्त केली आहे. त्यापूर्वी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. आणि त्यानंतर आॅप्थोमॉलॉजी (नेत्र विज्ञानशास्त्र) शाखेत पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. यानंतर त्यांची महाराष्ट्र शासनाकडून उपरोक्त पदावर निवड केली आहे़ याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ. निखिल हे राज्य कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेले उपविभागीय कृषी अधिकारी दत्ता शामसुंदर चांदोरे यांचे पुत्र आहे. उच्चविद्याविभूषित चांदोरे परिवारातील त्यांची कन्या निकिता यांनी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मुळचे दिघी (बेंबळा प्रकल्प) येथील रहिवासी असलेले चांदोरे कुटुंबीय सध्या यवतमाळात वास्तव्यास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *