आमिर खानचा दुसरा घरठावही संपला…

राजधानी मुंबई

मुंबई : अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण खान (राव) ऐकमेकांपासून अलग होण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांनी त्यांचा हा घरठाव [ AMIR KHAN KIRAN DIVORCED] संपणार असून, दोघांनही घटस्फोटाविषयी अधिकृत निवेदन जारी केले आहे.

आम्ही आमचा मुलगा आझाद यासाठी एक समर्पित पालक असून, त्याचे पालन-पोषण आम्ही एकत्र करू. तसेच, चित्रपट, पानी फाउंडेशन आणि अन्य प्रकल्पांसाठी सहकारी म्हणून काम करत राहू, असेही दोघांनी म्हटले आहे. दरम्यान, आमिर खानचे पहिले लग्न रिना दत्तासोबत झाले होते. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी आहे. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांनी विवाह केला. असे असले तरी आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने त्यांच्या हितचिंतकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लोकमत-18 ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *