Home अनुपमा... महिला विश्व अवकाश वारी : कल्पना चावला, सुनिता विलियम्स यांचा वारसा चालवणार सिरीशा बांदला

अवकाश वारी : कल्पना चावला, सुनिता विलियम्स यांचा वारसा चालवणार सिरीशा बांदला

52

भारतीय महिलांनी अनेक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कला, अर्थ, विज्ञान, साहित्य, अभियांत्रिकी, लष्कर, राजकारण, चित्रपट या क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाºया पेलताना दिसून येते. आणि आता अंतराळही काबीज करत आहेत. देशच नव्हे अमेरिकन प्रशासनातही भारतीय महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

PROUD TO BE INDIAN : कल्पना चावला यांच्यानंतर सुनिता विलियम्स यांनी अंतराळात भारतीय महिला म्हणून आपला ठसा उमटवला असतानाच आता सिरीशा बांदला या सुद्धा अंतराळ सफारीवर निघाल्या आहे. कल्पना चावला यांच्यानंतर सिरीशा अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला ठरणार आहे.

व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक तसेच प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रेनसन येत्या रविवारी 11 जुलैला अंतराळ सफरीसाठी रवाना होत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय वंशाची सिरीशा बांदला देखील अंतराळात जात आहे. सिरीशा बांदला व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीमध्ये सरकारी कामकाज आणि संशोधन कार्याशी संबंधित अधिकारी आहेत. रिचर्ड यांच्यासोबत अन्य पाचजण अंतराळ प्रवासासाठी जात आहेत. यापूर्वी दिवंगत अंतराळ शास्त्रज्ञ कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या; परंतु अंतराळ यान (स्पेस शटल) कोलंबियाच्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

सिरीशाने जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटीतून एमबीए केले असून, 2015 मध्ये व्हर्जिन कंपनी जॉईन केली होती. त्या व्हर्जिन आॅर्बिटचे वॉशिंग्टन येथील कामकाज पाहते. या कंपनीने नुकतेच बोईंग 747 विमानाच्या मदतीने एक उपग्रह अंतराळात पाठवला होता. अमेरिकेतील अंतराळयान कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या रिचर्ड ब्रेनसन यांनी आपले सहकारी अब्जाधीश जेफ बेझोस यांच्या 9 दिवस अगोदरच अंतराळ यात्रेचे नियोजन केले आहे.

दरम्यान, भारताकडून राकेश शर्मा सर्वप्रथम अंतराळात गेले होते. त्यांच्यानंतर कल्पना चावला, भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी देखील अंतराळावर पाऊल ठेवले होते. आंध्र प्रदेशातील गुंटूर हे सिरीशाचे मूळ गाव आहे.

 

KAVYABHILASHA … वाजतोय फक्त ढगांचा मृदंग सरीत अभंग