Home राज-पाट RAAJPAAT : विरोधकांकडे मुद्दे अनेक; पण दिवस केवळ दोनच..

RAAJPAAT : विरोधकांकडे मुद्दे अनेक; पण दिवस केवळ दोनच..

51
MONSOON ASSEMBLY 2021 : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. विरोधकांकडे मुद्दे अनेक मुद्दे आहेत; परंतु हातात केवळ दोनच दिवस आहेत. त्यामुळे मिळेल तिथे आणि मिळेल त्या संधीचा फायदा पुरेपूर घेण्याचा प्रयत्न राहिल.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायमच असताना डेल्टा प्लसचे आढळणाºया रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै अशा केवळ 2 दिवस घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीने घेतला. असे असले तरी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि पुरवणी मागण्या मंजूर करणे ही दोन महत्त्वाची कामे पार पाडायची आहेत.

दुसरीकडे अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची रणनीती विरोधकांनी रणनिती आखली आहे. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण, निवडणुकीतील रद्द झालेले ओबीसी आरक्षण, अनिल देशमुख यांच्याविरोधातील ईडीची कारवाई, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सचिन वाझे याने केलेले आरोप, राज्यातील कोरानाची स्थिती आणि लसीकरण या सर्व मुद्यांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे सरकारसमोरही अनेक मुद्दे आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात ठराव, पुरवणी मागण्या मंजूर करून घेणे, राज्याच्या कृषी कायद्यातील सुधारणांचे विधेयक मांडणे यांचा त्यात समावेश आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने आपला उमेदवार उभा केल्यास एकही मत फुटू नये याची काळजी महाविकास आघाडी सरकारला घ्यावी लागणार आहे. दोन दिवस का होईना अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना महाविकास आघाडी सरकारला त्याच ताकदीने सामोरे जावे लागणार आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये अनेकदा खडाजंगी झालेली आहे. पुन्हा तिच स्थिती अधिवेशनात दिसण्याची शक्यता आहे.