Home अनुपमा... महिला विश्व डॉ. सुबी चतुर्वेदी ‘इनोव्हेटिव्ह लीडर आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

डॉ. सुबी चतुर्वेदी ‘इनोव्हेटिव्ह लीडर आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

71

Abhivrutta Online News : संवादाच्या क्षेत्रात उत्तम योगदान देणाºया स्त्रियांची दखल घेण्यासाठी एक्स्चेंज फॉर मीडियाकडून प्रतिष्ठेच्या वूमेन अचिव्हर्स समीट अँड अवॉर्ड्स २०२१ची घोषणा करण्यात आली. झुपीच्या चीफ कॉपोर्रेट अफेअर्स अँड पॉलिसी आॅफिसर डॉ. सुबी चतुर्वेदी [dr subi chaturvedi ] यांना इनोव्हेटिव लीडर आॅफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सार्वजनिक तसेच धोरणात्मक क्षेत्रात उत्तम संवादासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात व आॅनलाइन गेमिंगला आकार देण्यात नेतृत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. चतुर्वेदी सकारात्मक बदल व डिजिटल रुपांतरणाच्या खंद्या पुरस्कर्त्या आहेत. संयुक्त राष्ट्र महासचिवांनी मंजुरी दिलेल्या युनायटेड नेशन्स इंटरनेट गव्हर्नन्स फोरम या, माध्यमे व नागरी समुदाय यांच्यासह, अनेकविध संबंधितांचे प्रतिनिधित्व असलेल्या मंचावर नियुक्त होणाºया त्या पहिल्या भारतीय स्त्री आहेत. त्या सध्या फिक्कीतील महिला विभागातील टेक्नोलॉजी पॉलिसी अँड लीडरशिप उपसमितीच्या अध्यक्षा आहेत.

या सन्मानाबाबत डॉ. सुबी चक्रवर्ती म्हणाल्या, की पुरस्काराच्या माध्यमातून माझ्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल मी आयोजकांचे व परीक्षकांचे आभार मानते. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया ही स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी अविश्रांत काम करणाºया भारतातील तरुण व प्रतिभावान उद्योजकांचेही आभार मानते.

सरकारच्या सेल्फीसंबंधी या आहेत सूचना
मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची केंद्र शासनाला शिफारस