Home राजधानी मुंबई पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस, 12 भाजपा निलंबित आणि राज्यपालांशी भेट

पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस, 12 भाजपा निलंबित आणि राज्यपालांशी भेट

20

VIDHIMANDAL MONSOON ASSEMBLY MUMBAI 2021 : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार हल्ला (अर्थात शाब्दिक) प्रतिहल्ला पाहाण्यात आला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना तब्बल एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. [ 12 BJP MLA SUSPENDED IN VIDHANSABHA ]

अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचे निलंबन करण्यात आले. यानंतर 12 आमदारांनी तत्काळ राज्यपालांची भेट घेतली आणि या संदर्भात त्यांना एक निवेदनही दिले.

ठाकरे सरकारच्या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असल्याचे आमदारांनी सांगितले. सभागृहात आम्हाला बोलू द्या, अशा मागणीवर असताना भाजप आमदारांवर शिवीगाळ केल्याचा खोटा ठपका ठेवत निलंबित केल्याचे निवेदनात म्हटले आहे. भाजपच्या आमदारांनी अशा प्रकारची शिवीगाळ केलेली नाही. तरीही लोकशाहीचा गळा घोटून महाविकास आघाडीकडून सभागृहाचे कामकाज चालवले जात आहे.आमच्यावर केलेले आरोप आम्हाला अमान्य असल्याचाही त्यात उल्लेख आहे.