Home राज-पाट कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले कृपाशंकर सिंह आज भाजपात प्रवेश करणार

कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले कृपाशंकर सिंह आज भाजपात प्रवेश करणार

37

मुंबई : काँग्रेसचे माजी नेता कृपाशंकर सिंह आज बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. नाशिकमधील युवा नेतृत्व यतीन रावसाहेब कदम सुद्धा कमळ हाती धरणार आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांचा अधिकृतरित्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

कृपाशंकर सिंह यांनी सुमारे 20 महिन्यांपूर्वी म्हणजे 10 सप्टेंबर 2019 या दिवशी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला होता. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यावर काँग्रेसचा विरोध मान्य नसल्याचे सांगत ते बाहेर पडले होते. पंतप्रधान मोदींचा हा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी आपल्या पक्षाला आव्हान दिले होते. दरम्यान, 2019 ते आतापर्यंत कुठल्याच पक्षाचे सभासद नसल्याने त्यांचा भाजपासाठी कितपत फायदा होतो, हे येत्या महानगरपालिका निवडणुकीत दिसून येणार आहे.