Home रानशिवार ब्रेकिंग न्यूज … राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नियुक्त्या आणि अन्य

ब्रेकिंग न्यूज … राष्ट्रपतींकडून राज्यपालांच्या नियुक्त्या आणि अन्य

31

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे, तर हरी बाबू कंभमपती मिझोरमचे नवीन राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळतील.

मंगुभाई छगनभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे नवीन राज्यपाल म्हणून तर राजेंद्र्रन विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. पी.एस. श्रीधरन पिलाई गोव्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळतील.

सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून तर बंडारू दत्तात्रेय यांची हरयाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

***

जेईई मुख्य परीक्षाच्या दोन सत्रांची तारीख जाहीर
नवी दिल्ली : जेईई मुख्य परीक्षाच्या तिसºया आणि चौथ्या सत्रांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही दोन्ही सत्रे 20 जुलै ते 2 2 आॅगस्ट दरम्यान होतील. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियल निशंक यांनी याबाबत मंगळवारी घोषणा केली.

माहितीनुसार, यंदा कोरोना (ं) महामारीमुळे जेईई मुख्य ही परीक्षा चार सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली तर दुसरे सत्र मार्चमध्ये घेण्यात आले. आता शिक्षण मंत्रालयाने तिसरे सत्र 20 ते 25 जुलै दरम्यान आयोजित केले आहे. तसेच, चौथे सत्र 27 जुलै ते 2 आॅगस्ट या काळात पार पडेल, असेही मंत्र्यांनी सांगितले.

***

गरीब कल्याण योजनाअंतर्गत अन्नधान्याचा पुरवठा

नवी दिल्ली : पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ आघाडीवर असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

भारतीय अन्न महामंडळ अर्थात एफसीआयचे महाराष्ट्र महाव्यवस्थापक के.पी. आशा यांनी सांगितले, की मे जून २०२१ दरम्यान ३ लाख ६८ हजार मेट्रिक टन गहू आणि २ लाख ५७ हजार मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रासाठी ७ लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आले होते.

***

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दीड कोटींची कामे

मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दीड कोटीपर्यंतची कामे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता. सद्यस्थितीत सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे मिळत होती.

चव्हाण यांनी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणीकरणामध्ये वाढ करावी, अशी मागणीही केली होती. या संदर्भातील प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.