Home राजधानी मुंबई ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

17

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी 7.30 सुमारास निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा एक बुरुज ढासळल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दिलीप कुमार [ DILIP KUMAR ] यांची मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. अशातच आज त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांचे 88 वर्षांचे भाऊ असलम खान आणि 90 वर्षांचे एहसान खान यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते.

दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टी 1940-70 हा काळ आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवला. 1944 मध्ये आलेल्या ज्वार भाटाया चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. त्यानंतर आलेला मिलन हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यांना बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग [ TRAGEDY KING ] म्हणून ओळखले जायचे. सन 1998 मधील किला हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता.