Home अनुपमा... महिला विश्व केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भारती पवार यांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भारती पवार यांना संधी

63

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. यात 7 महिला मंत्र्यांनी शपथ घेतली असून, त्या सर्व राज्यमंत्री आहेत. यात महाराष्ट्रातून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील भारती पवार यांना संधी मिळाली आहे.

उल्लेखनीय म्हणजे 43 शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी 28 राज्यमंत्र्यांत पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल (अपना दल), सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडालजे, भानू प्रतापसिंह वर्मा, दर्शन विक्रम, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए. नारायणसामी, कौशल किशोर,अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, देवसिंह चौहान, भगवंत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, भागवत कराड, राज कुमार रंजन सिंग, भारती प्रवीण पवार, दर्शना विक्रम जरदोश, विशेश्वर टुडू, शांतनू ठाकूर, मुंजापारा महेंद्र भाई, जॉन बराला, एल मुर्गुन, निशित प्रमाणिक यांचा समावेश आहे.

या 7 महिला मंत्र्यांमध्ये कर्नाटकच्या उडुपी येथील शोभा करंदलाजे, नवी दिल्लीतील मीनाक्षी लेखी, झारखंडच्या कोडरमा येथून अन्नपूर्णा देवी, त्रिपुरा पश्चिमच्या प्रतिमा भौमका, महाराष्ट्रातील दिंडोरी येथून भारती प्रवीण पवार, गुजरातच्या सुरत येथील दर्शना विक्रम जरदोश, अनुप्रिया पटेल (अपना दल) यांचा समावेश आहे.

मंत्रिमंडळातील एकूण महिला मंत्री 11

* कॅबिनेट -2
* राज्यमंत्री – 2
(नवीन शपथविधी)-7