Home राज-पाट केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राजीनामेही…

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राजीनामेही…

26

नवी दिल्ली : मोदी सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळात सात राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक, अकार्यक्षम वा कामात मागे पडलेल्या सहकाºयांना डच्चू आणि नव्या उमेदीच्या तरुणांना संधी असा तिहेरी संयोग या विस्तारातून घडवून आणला आहे. त्यामुळेच आरोग्यमंत्री हर्षवर्धन, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रकृती अस्वास्थाचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना जवळपास 15 दिवसांसाठी आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागले. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनाही राजीनामा द्यावा लागला़ कोरोना स्थिती हाताळण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही, हे एक कारण असू शकते. सध्या हर्षवर्धन दिल्लीतील चांदनी चौक यैथील लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत. महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. (त्यांच्याऐवजी नारायण राणे आणि भारती पवार यांना स्थान मिळाले आहे.)

दरम्यान, सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉ हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, संतोषकुमार गंगवार, बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगी, देवश्री चौधरी अशा एकूण 12 जणांना राजीनामा द्यावा लागला आहे.