कौशल्य विकास मुख्यालयातील उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

उपराजधानी नागपूर

नागपूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालयातील उपायुक्त सुनिल रामभाऊ काळबांडे (55 वर्षे) 25 हजारांची लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सूत्रांनुसार, तक्रारदार चंद्र्रपूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत आहेत. फेबु्रवारी 2021 मध्ये तक्रारदार यांची वरिष्ठ लिपीक पदावरून कनिष्ठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पदावर पदोन्नती व पदस्थापना मिळणेकरिता चंद्र्रपूर येथील कार्यालयातून उपायुक्त कार्यालय, नागपूर यांचे मार्फत आयुक्तालय, मुंबई येथे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. 16 मार्च 2021 रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालय, नागपूर येथील उपायुक्त सुनिल काळबांडे यांनी तक्रारदाराच्या मोबाईलवर संपर्क साधला. तुमचे नाव पदोन्नती तसेच चंद्रपूर येथेच नियुक्ती मिळण्याकरिता आयुक्तालय (मुंबई) येथे पाठविले असून, या कामासाठी वरिष्ठ कार्यालयात बोलणी केलेली आहे. त्यासाठी तक्रारदारास 25 हजारांची लाचेची मागणी केली.

मग ठरलं … शिक्षकांची सहा हजार शंभर पदे भरणार

मात्र, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील कार्यालयात तक्रार नोंदविली़ पोलिस उपअधीक्षक योगिता चाफले यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. यानंतरच्या कारवाईत शुक्रवारी लाच स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिंबधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी रश्मी नांदेडकर, पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगिता चाफले, नापोशि रविकांत डहाट, अमोल मेंघरे, अनिल बहिरे, मपोशि अस्मिता मेश्राम, प्रिया नेवरे यांनी केली.

वो शादी के रास्ते चली गयी और मैं बरबादी के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *