Home प्रादेशिक विदर्भ अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा, व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त १०० कोटींचा प्रस्ताव

अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा, व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त १०० कोटींचा प्रस्ताव

41

अमरावती : विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय [ VMV AMRAVATI ] येत्या 2022-23 मध्ये शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विकास कामांसाठी शंभर कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या 10 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. श्री. सामंत यांनी विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेस भेट दिली.

श्री. सामंत यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच परिसरात वृक्षारोपण केले.

अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला [ AMRAVATI ENGINEERING COLLAGE ] स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आज या महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली. स्वायतत्ता मिळाल्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थानिकस्तरावर निर्णय घेऊन विकासकामे करतील. त्यांना आता मंत्रालयाच्या परवानगीची गरज राहणार नाही. महाविद्यालयाने उपकेंद्राच्या माध्यमातून आपल्या कक्षा वाढवाव्यात. उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. सामंत यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी तंत्रशिक्षण सहसंचालक तथा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर, शासकीय विदर्भ ज्ञान विद्यान संस्थेचे संचालक डॉ. वसंत हेलावीरेड्डी, औषधनिर्माणचे प्राचार्य डॉ. एस. एस. खडबडी, अधिष्ठाता डॉ. एस. डी. लोंढे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने तंत्र विद्यापिठ स्थापन केले आहे. इतर विद्यापिठांशी संलग्न होण्यापेक्षा तंत्र विद्यापिठाशी संलग्नता तसेच इतर बाबींसाठी पाठपुरावा करावा. विभागाने अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी पाठपुरवा सुरू केला आहे. या नियुक्त्या तातडीने करून यातील प्रतिक्षायादी शुन्यावर आणावी, तसेच तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी विद्यार्थी संपर्क अभियान उपयुक्त ठरले. यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या जागा भरण्यात येत आहे. गेल्या वर्षात 690 कोटी रूपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. येत्या काळातही शिष्यवृत्तीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास मुख्यालयातील उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
माजी सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित